Advertisement

बब्बूभाई बारुदवाले यांचे निधन 

प्रजापत्र | Wednesday, 28/07/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई दि.२८ ( प्रतिनिधी ) शहरातील मोमीनपूरा येथील सामाजिक कार्यकर्ते,र. भ.अट्टल महाविद्यालयाचे विकास समिती सदस्य सय्यद मुनाफ उर्फ बब्बूभाई बारुदवाले ( वय ३८ वर्ष)  यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दुपारी २.३० वाजता गेवराईतील मोमीनपुरा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे. 

 

अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच अनेकांना धक्का बसला. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असत मित्रपरिवारही मोठा होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले, एक भाऊ,  दोन बहिणी असा परिवार आहे. बब्बू भाई बारुदवाले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात दैनिक प्रजापत्र परिवार सहभागी आहे.

 

 

Advertisement

Advertisement