आष्टी-तालुक्यातील अंभोरा ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला ८० हजारांची लाच घेताना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.सोमवारी (दि.२६) ही कारवाई करण्यात आली.
राहुल पांडुरंग लोखंडे असे लाचखोर पोलिसाचे नाव असून ते अंभोरा ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आहेत.तक्रादाराकडून एका गुन्हयात मंजूर असलेला जामीन मा. हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.तडजोडी अंती ८० हजारांची लाच घेताना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला पकडले आहे.दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा