Advertisement

दारुड्या पोराने केला बापाचा खून

प्रजापत्र | Saturday, 24/07/2021
बातमी शेअर करा

शिरूर (का )- दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारल्याने चिडलेल्या मद्यधुंद पोराने बापावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरूर का. तालूक्यातल लिंबा येथे ही घटना घडली. त्या दारुड्या पोरावर खुनाचा  गुन्हा नोंद झाला आहे. 

 

गणेश बाबासाहेब नागरगोजे (वय ५०, रा. लिंबा, ता. शिरूर का.) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी यास दारूचे व्यसन आहे. मंगळवार (१३ जुलै) रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्वामी दारू पिऊन घरी आला. त्यामुळे गणेश यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास असा जाब विचारला आणि त्याची कानउघडणी केली. वडिलांनी रागावल्याने संतापलेल्या स्वामीने चाकूने त्यांच्यावर हल्ला चढविला आणि कपाळावर, खांद्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (२० जुलै) दुपारी १.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला असे पोलीस हवालदार हरी जाधव यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून स्वामी गणेश नागरगोजे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Advertisement

Advertisement