Advertisement

कृष्णा सोनटक्के यांचे अपघाती निधन 

प्रजापत्र | Sunday, 18/07/2021
बातमी शेअर करा

 धारूर दि.१८ जुलै - शहरातील बाराभाई गल्लीतील तरुण कृष्णा सोनटक्के (३५) हे धारुरहून अंबाजोगाईकडे जात असताना कुंबेफळ येथील पुलावरुन खाली गाडी कोसळल्याने त्यांचे जागीच निधन झाले.केज तालुक्यातील कुंबेफळ येथील पुलावर आज पहाटे सहाच्या दरम्यान अपघात  झाला. कृष्णा सोनटक्के आपल्या स्कार्पिओ  क्र.एम.एच. ४४ जी.८३१३ या गाडीने पहाटे धारुरहून  केज मार्गे अंबाजोगाईकडे जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली. यात ते जागीच गतप्राण झाले.

 

 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन त्यांचे पार्थिव केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. त्यांच्यावर धारुर येथील वैकुंठ स्मशानभुमीत १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दत्तात्रय सोनटक्के यांनी दिली.शहरात अपघाताची माहिती कळताच नातलग घटनास्थळी रवाना झालेत. कृष्णा सोनटक्के हे शहरात सर्वपरिचित होते. यांच्या अकाली अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement