बीड-जिल्ह्यात मागील चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत येत नसून रविवारी (दि.११) ३९१५ तपासण्यांमध्ये १५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये सर्वाधिक बीड तालुक्यातील आहेत.
बीड जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या जवळ गेली होती.त्यानंतर हा आलेख कमी कमी होत घटत आहे.रविवारी अंबाजोगाई ६,आष्टी ३३,बीड ३४,धारूर ५,गेवराई २३,केज १४,माजलगाव २,परळी ३पाटोदा २०,शिरूर ७,वडवणी १० रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा