बीड (प्रतिनिधी)- ६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तेथीलच एका १५ वर्षीय मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल संध्याकाळी घडली.या प्रकरणात पीडिता आणि दोघेही अल्पवयीन असून पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध कलम ३७६ (२) (आय) आयटीसीच्या कलम ४,५ (एम),६ पोस्को प्रमाणे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा