Advertisement

 छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू

प्रजापत्र | Saturday, 03/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड – मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी सध्या छत्रपती संभाजी महाराज सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.  

 

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

 

 

तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement