Advertisement

अँटीजन तपासणीत पहिल्या दिवशी २१० बाधित, वाचा कोणत्या शहरात किती?

प्रजापत्र | Tuesday, 18/08/2020
बातमी शेअर करा

बीडः पाच शहरातील व्यावसायिकांच्या अँटिजनटेस्टचा पहिल्या दिवशी जिल्ह्यातील पाच हजार सातशे छप्पन व्यक्तींची तपासणी करण्यात आली यात तब्बल २१० व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, आष्टी या शहरांमध्ये व्यावसायिकांची अँटीजन तपासणी मोहिम मंगळवारी सुरु झाली. पहिल्या दिवशी तब्बल ५७५६ व्यक्तींची तपासणी झाली. यात माजलगावात सर्वाधिक ७१ तर परळित ६६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यासोबतच आष्टी १७, केज १९ तर अंबाजोगाईला ३७ व्यावसायिक कोरोनाबाधित आढळले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा अचानक वाढला आहे.

Advertisement

Advertisement