Advertisement

कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात 

प्रजापत्र | Friday, 02/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.शुक्रवारी (दि.२) आरोग्य विभागाच्या अहवालात १११ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३०७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

 

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४,आष्टी १७,बीड १४,धारूर ५,गेवराई ८,केज ९,माजलगाव ३,परळी ६,पाटोदा ३०,शिरूर ८ आणि वडवणीत ७ रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान आष्टी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.मात्र आता नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे.तर पाटोद्यात मात्र नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे.

 

 

Advertisement

Advertisement