बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर घटला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.गुरुवारी (दि.१) बीड जिल्ह्यात ३८५८अहवालात १०३ पॉझिटिव्ह आले असून ३७५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.गुरुवारी आरोग्य विभागाच्या तपासण्या मात्र काही प्रमाणात वाढल्या असल्याचे चित्र समोर आले.
गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.६६ % टक्के एवढा आहे.
आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४,आष्टी २१,बीड ११,धारूर ११,गेवराई १५,केज ७,माजलगाव ६,परळी २,पाटोदा १७,शिरूर ४,वडवणी पाच रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा