Advertisement

दोन वर्षात या सरकारने सर्वांची वाट लावली : आ. धस

प्रजापत्र | Monday, 28/06/2021
बातमी शेअर करा

 

 बीडः दोन वर्षात या सरकारने सर्व सवलती बंद केल्या, सर्वांची वाट लावली. महिनाभरात निर्णय झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढु  असा ईशारा आ. सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आयोजित मोर्चात ते बोलत होते.
आ. धस यांच्या नेतृत्वातील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाला उद्देशुन बोलताना आ. धस यांनी कोणिही मोर्चे काढल्यावर लोक येत नाहीत, त्यासाठी रोज लोकात रहावं लागतं.लोकांना कोविड सेंटरला जाऊन आधार द्यावा लागतो असा टोला मारत भाषणाला सुरुवात केली. मराठा समाजाचे आरक्षण या सरकारच्या गलथानपणामुळे गेले. यांचे वकिल उपस्थित राहत नव्हते.यांनी मराठा समाजाच्या पिढया बरबाद केल्या. आरक्षण मिळायच तेव्हा मिळेल, तो पर्यंत आमच्या लेकरांची फी तरी भरा, स्थगितीपुर्वीच्या नियुक्त्या द्या अशी मागणी त्यांनी केली.  ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हे तारखावर तारखा वाढवित गेले आणि त्यातूनच हे आरक्षण गेले असा आरोप आ. धस यांनी केला. ऊसतोड कामगारांसाठी कायदा, पिक कर्ज यासाठी गरज टडली तर पुन्हा मोर्चा काढु असा इशारा त्यांनी दिला.

 

पटोलेंच्या कार्यक्रमाला गर्दी, राष्ट्रवादी चा परिसंवाद, सेनेचे कार्यक्रम सुरुयत, यांना कोणालाच कोरोना नाही, फक्त अधिवेशनाला कोरोनाय. हे सरकार फक्त घोषणा करतय. रेमडीसेविर ३५ हजारापेक्षा कमी मिळाल का?असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कपट कारस्थानाने आलेल सरकार आहे असे ते म्हणाले. ज्या देवेंद्र फडणविसांना साडेतीन टक्के म्हणून हिणवलं, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असेही आ. धस म्हणाले. फडणविसांवर फेक अकाउंट वरुन टिका करता, कंगणाच घरं पाडता, आ. मेटेंच्या कार्यक्रमात  गोंधळ घालता, विचार दाबण्याचा हा प्रकार असल्याची टिका त्यांनी केली. 

 

पंधरा पंधरा दिवस अर्धा तालुका अंधारातय, मावेजासाठी शेतकरी जाळुन घेतोय,ना मावेजा मिळतोय ना कोणाला अटक होते,मग मोर्चे काढायचे नाहित तर काय यांच्या पाया पडायचे का? तुम्ही कोरानामुळे झालेले बळीसुध्दा लपवताय. म्युकरमायकोसीस वाढतोय सरकारचं लक्ष कुठय? असेही आ. धस म्हणाले.
तत्पूर्वी आ. लक्ष्मण पवार यांनी मराठा समाजाला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. या सरकारच्या काळात मराठा, ओबिसींचे आरक्षण गेले आहे.

 

 

बीड जिल्हयासाठी मराठवाडा वाँटरग्रिड योजना मागच्या सरकारने दिली होती, पण या सरकारने ती योजनाही गायब केल्याचे म्हटले.या सरकारला फक्त वसुलीचे पडले आहे असेही आ. पवार म्हणाले.
माजी आ.आर.टी. देशमुख यांनी यावेळी आ.धसांचा उल्लेख झुंजार नेतृत्व असा करित अठरा पगड जाती जमातिला न्याय देण्यासाठी हा मोर्चा असुन त्यात आ.धस यांना नक्कीच यश मिळेल असे सांगितले.तसेच आ.धस यांच्यासाठी प्राणाची बाजी लाऊ असा शब्दही दिला.
या मोर्चात मिरा गांधले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी जाधव, उसतोड कामगार संघटनेचे सुग्रीव सानट,अभिजित शेंडगे, यांच्यासह गंगाधर काळकुटे, सचिन उबाळे, संभाजी सुर्व यांची समयोचित भाषणे झाली
 

Advertisement

Advertisement