Advertisement

 पोलिस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खुन

प्रजापत्र | Friday, 25/06/2021
बातमी शेअर करा

 

 बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला आहे . ही घटना गुरुवारी ( दि .२४) रात्री १०च्या सुमारास घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांना माहिती मिळताच धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत . भिमराव ससाणे ( वय ५० रा.मानखुरवाडी ता.जि.बीड ह.मु.ढेकणमोहा ) असे मयताचे नाव आहे . ते पोलीस पाटील आहेत . ढेकणमोहा फाट्यावर त्यांच्या डोक्यात खोऱ्याने वार करत अज्ञातांनी  त्यांचा खून  केला .

 

 

 

  या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके,पिंपळनेर पोलिस ठाण्याचे स.पो.नि मुस्तफा शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा खून कोणी व का केला हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement