बीड दि. २२ (प्रतिनिधी)- बीड जिल्हा पोलीस दलात आज 165 वाहने दाखल झाली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलास 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, डायल 112 पथकासाठी 2 बोलेरो, तसेच 2 टियूव्ही गाड्या खरेदी केल्या असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज या वाहनांचा लोकार्पण सोहळा शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जनतेचे रक्षक करत असताना पोलीस बांधवास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात जुन्या वाहनांची अडचण पण मोठया प्रमाणात आहे. चोरटयांकडे चांगल्या गाडया असतात परंतु पोलीसांकडे मात्र जुन्या गाड्या याचाच फायदा घेऊन चोरटे चोऱ्या करुन पसार होतात. परंतु आता बीड पोलीस दलात नव्या वाहने दाखल झाली आहेत. यात १४ चार चाकी तर १५१ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. ही वाहने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात मोठी मदत करणार आहे. आज शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात नविन गाड्यांचे पुजन करुन लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.