Advertisement

कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजार लवकर होत नाहीत, संशोधकांचा दावा

प्रजापत्र | Monday, 17/08/2020
बातमी शेअर करा

वॉशिंग्टन : कोरोनावर नियंत्रण करणाऱ्या रोगप्रतिकार शक्तींवर केलेल्या एका नव्या संशोधनात महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जे लोक कोरोना होऊन बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती (कोरोना अँटीबॉडी) इतर आजारांनाही रोखण्यात सक्षम असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे कोरोनाविरुद्ध शरीरात तयार झालेली ही रोग प्रतिकार शक्ती इतर विषाणूंना शरीरात येण्यापासून रोखते. हे संशोधन अमेरिकेत करण्यात आलं आहे.
अमेरिकेतील सिएटलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या तिघांना या आजाराचा सर्वाधिक प्रकोप होत असलेल्या ठिकाणी एका मासेमारी करणाऱ्या जहाजावर क्वारंटाईन करण्यात आलं. त्यांचा अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या शरीरातील अँटीबॉडीज (Antibodies) दुसऱ्या रोगांच्या संसर्गाला देखील रोखण्यास सक्षण असल्याचं समोर आलं. हे संशोधन अँटीबॉडी आणि व्हायरल डिटेक्शन टेस्टवर आधारित आहे. त्याच्या निष्कर्षातून हा दावा करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement