बीड दि.(२२)-प्रतिनिधी- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सचिन मुळूक यांना हा अनपेक्षित धक्का मानला जात आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड वा लातूर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माजलगाव, परळी,केज विधानसभा जिल्हाप्रमुख पदी आप्पासाहेब कडाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली तर उपजिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर, शिवाजी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. आप्पासाहेब जाधव यांच्या निवडीमुळे माजलगाव मध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
बातमी शेअर करा