Advertisement

बॉलिवूडमध्ये महाराष्ट्राचा झेंडा रोवणारा दिग्दर्शक निशीकांत कामत काळाच्या पडद्याआड

प्रजापत्र | Monday, 17/08/2020
बातमी शेअर करा

मुंबई-‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशीकांत कामत यांचे निधन झाले.  हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निशीकांत ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशीकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.

 

Advertisement

Advertisement