पाटोदा-तालुक्यातील भायाळा गावात तीन दिवसापूर्वी कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बाधितांच्या संपर्कातील चाळीस ते पन्नास जणांचे स्वब घेण्यात आले असून आज रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल येणार आहे.मात्र तत्पूर्वी पुण्यावरून आलेला एक तरुण व्यापारी क्वारंटाईनचा नियम धाब्यावर बसवत असल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात ही कोरोनाचा संसर्ग अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील एक तरुण व्यापारी पुणे येथे लोखंड खरेदी विक्रीचे काम करत होता.मागील चार ते पाच दिवसापूर्वी हा तरुण पुण्यावरून आपल्या गावाकडे आल्यानंतर त्याला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या.मात्र सदरचा तरुण संपूर्ण गावभर टोळके गोळा करत फिरत असल्याने ग्रामस्थांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे.दरम्यान एका तरुणामुळे अख्ख गावं वेठीला धरले असून त्या तरुणाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रजापत्र | Sunday, 16/08/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा