बीड -लॉकडाऊनमुळे लाखो कामगार बेरोजगार झाले. बेरोजगारांचा लोंढा आता ग्रामीण भागाकडे वळू लागला. मात्र ग्रामीण भागातही रोजगार नसल्याने तरुणात नैराश्य येऊ लागले. अशाच एका तरुणाने
नैराश्यातून नेकनूर येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाजीराव सुदाम पांचाळ (वय ३२,रा. माळीगल्ली,नेकनूर) हा तरुण गेल्या अनेक महिन्यापासून पुणे येथे खासगी तत्वावर कंपनीत कामाला होता. मात्र लॉकडाऊन आणिकोरोनामुळे पुणे येथील त्याचे काम बंद पडल्याने तो गावाकडे आला होता. गावातही काम मिळत नसल्याने सदरील तरुण नैराश्यात राहत असे. याच नैराश्यातून त्याने काल आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी वाघमारे,दीपक खांडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नेकनूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.