बीड दि.१५ (प्रतिनिधी)-चौसाळा येथील कापड व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सदरील व्यावसायिकाने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली.हे अद्याप समजू शकले नाही. गिरीश गणेशराव शिंदे (वय ४२) यांचे चौसाळा येथे श्री.कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. या व्यवसायिकांनी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
बातमी शेअर करा