Advertisement

दहा हजाराची लाच घेताना पुरवठा निरीक्षक जाळयात

प्रजापत्र | Tuesday, 15/06/2021
बातमी शेअर करा

बीडः बीडच्या तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक असलेल्या रविंद्र ठाणगे याला दहा हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. तहसिल कार्यालयातच हा सापळा रचण्यात आला. ठाणगेचा पैसे घेतानाचा व्हिडीओ यापुर्वी व्हायरल झाला होता.

बीड तहसिल कार्यालयात आल्यापासुन वादग्रस्त असलेल्या रविंद्र ठाणगे विरोधात यापुर्वी अनेक तक्रारी होत्या. मात्र प्रशासन कारवाई करीत नव्हते. मंगळवारी सकाळी अखेर एसीबीनेच तहसिल कार्यालयात जाळे टाकून ठाणगेला पकडले आहे. दहा हजाराची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

Advertisement