बीडः बीडच्या लोटस आणि परळीच्या कराड या खाजगी रुग्णालयापाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील आणखी पाच खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेता येणार आहेत. यात माजलगाव, बीड,अंबाजोगाईआणि परळीच्या रुग्णालयांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आणखी पाच खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. यात माजलगावचे यशवंत हाँस्पीटल, बीडचे पँराडाईज आणि स्पंदन, परळीचे मुंडे हाँस्पीटल आणि अंबाजोगाईच्या घुगे hospital चा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यातील दोन खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. आता या पाच रुग्णालयांमुळे कोरोनावर उपचार देऊ शकणाऱ्या खाजगी रुग्णालयांची संख्या ७ झाली आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बातमी शेअर करा