परळी-परळी अंबाजोगाई मार्गावरिल कन्हेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीसाठी पुला लगतच तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढला होता परंतु दुपारी नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा जोराचा पाऊस झाल्याने हा पुल अक्षरश: सपाट झाला आहे यामुळे परळी अंबाजोगाई राज्य महामार्ग बंद झाला असुन वाहतूक ठप्प झाली आहे.
कालपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे या पावसाचे पाणी घाटातुन शेतकऱ्यांच्या शेतात शेतातून होऊन नदीला आल्याने हा पूल वाहून गेला आहे यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे वाहनाच्या जवळजवळ दोन किलोमीटर रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रवासासाठी प्रचंड गैरसोय झाली आहे,दरम्यान नंदागौळ कनेरवाडी घाट परिसरात असलेल्या शेतीचेही फार मोठे नुकसान झाल्याची माहिती येत आहे ढगफुटी ची माहिती मिळताच महसूल अधिकारी ग्रामीण पोलीस घटनास्थळी पाहणी करत आहेत.