Advertisement

स्वारातीत कोरोनाचे आणखी चार रुग्ण दगावले

प्रजापत्र | Friday, 14/08/2020
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दोन दिवसापूर्वी सहा कोरोनाग्रस्तांचा व एका कर्मचार्‍यंाचा मृत्यु झाल्यानंतर शुक्रवारी (दि.14) सायंकाळी आणखी चार कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले आहेत. हे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच अत्यावस्थ होते व त्यांना श्‍वसनाचा त्रासही असल्याची माहिती आहे. यातील काही रुग्णांना कोमॉरबीट होते.
शुक्रवारी २३ संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले असून कालचे काही प्रलंबित असे ३५ नमुन्यांचे अहवाल आज रात्री उशीरापर्यतं येणार आहेत.सध्या येथे १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३४ रुग्ण दगावले आहेत. यातील काही रुग्ण परजिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. 

 

Advertisement

Advertisement