Advertisement

खरा आधार

प्रजापत्र | Friday, 14/08/2020
बातमी शेअर करा

नितीन राऊत 
मो-९७६५२०००९७ 

'भाऊ एक अडचण आहे ? ’ असं आपण फक्त म्हणायचं , अडचण काय असेल, किती मोठी असेल याची कल्पना नसतानाही 'असू दे , आपण सोडवू ,  पाहू काय करता येतं ते ’ हे ठरलेलं उत्तर ऐकू येतं . आणि मग अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मोठा आधार मिळतो, त्याला अडचण सांगण्यासाठीच बळ मिळतं . सारी अडचण, समस्या सविस्तर ऐकून घ्यायची आणि नंतर त्याचं समाधान देखील शोधायचं . तो प्रश्न जो पर्यंत सुटत नाही, तोवर त्याचा पाठपुरावा करायचा , आणि कार्यकर्त्यांचं समाधान करायचं . बरं  हे एका दिवसाचं नाही , किंवा एखाद्या कार्यकर्त्याबाबतीत होतं असेल असंही नाही. मागच्या 10-15 वर्षांपासून त्यांचा हा धीर देण्याचा , आधार होण्याचा आणि कार्यकर्ता उभा करण्याचा ’उद्योग ’ सातत्याने सुरु आहे. हे वर्णन कोणाचं असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही .अखिल भारतीय  महात्मा फुले समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचच हे वर्णन .


सुभाष राऊत , महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांचे विचार समाजात रुजविण्याचे काम करणारा हा संघर्ष योद्धा , खर्‍या अर्थाने, ते एक वेगळे नेतृत्व आहे. कायम हसतमुख , कार्यकर्त्यांसाठी कधीही उपलब्ध असणारं हे व्यक्तिमत्व . त्यांचे कार्यकर्ते जिल्ह्याच्या कोणत्याही कोपर्‍यात पसरलेले , आणि हो त्यांना वयाचं बंधन देखील नसतं . एकाच घरात आजोबांपासून नातवापर्यंत सर्वांशी गट्टी जमवू शकणारे , किंवा सर्वांनाच आपले वाटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. तीन पिढ्यांशी संवाद साधत त्यांना एकत्र बांधून ठेवणे सोपे नसते , मात्र ती कला सुभाष राऊत यांना चांगली अवगत आहे.


नेते छगन भुजबळ म्हणजे सुभाष राऊत यांच्यासाठी दैवत . छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले, त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागले, त्यावेळी अस्वस्थ झालेले, प्रयेक तारखेला न चुकता जाणारे, आणि अगदी  ’साहेबांचा चेहरा पाहवत नाही ’ असे म्हणून परेशान  झालेले सुभाष राऊत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहेत. भुजबळ साहेबांसाठी मोर्चा काढण्याची वेळ आली. अनेकजण हा मोर्चा काढू नये , लोक येणार नाहीत असे त्यांना सांगत होते. मात्र ’साहेबांसाठी आताच आवाज उठवायची वेळ आहे, आपण मोर्चा काढायचा, कोणी काहीही म्हणले तरी काढायचा ’ यावर ते ठाम होते, आणि त्यांनी ते आंदोलन सुरु करूनच दाखवलं , त्यानंतर ते आंदोलन राज्यात पोहचलं, नेत्याप्रती श्रद्धा असावी तर ती  कशी याचं यापेक्षा वेगळं  उदाहरण कोणतं असू शकेल.


जसनेत्याबद्दलच्या श्रद्धेचं , तसेच कार्यकर्त्यांबाबतच्या जबाबदारीच , कार्यकर्त्यांच्या  अडचणी काय आहेत, त्याच्या घरात काय अडचणी आहेत , त्याला कोणत्यावेळी कोणत्या मदतीची गरज आहे , हे सुभाष राऊत यांना सांगावे लागत नाही. अनेकदा काही कार्यकर्ते संकोचामुळे म्हणा किंवा इतर कोणत्या कारणांनी म्हणा , आपली अडचण सुभाष राऊत यांना सांगत नाहीत, मात्र कोणाकडून तरी ती भाऊंना कळते , आणि मग भाऊ थेट त्या अडचणीचं समाधान करूनच कार्यकर्त्याला कळवतात. आणि पुन्हा हे सारे करताना त्याचा कोठे गवगवा नसतो. मी तुमच्यासाठी अमुक केलंय असं कधी म्हणणार नाहीत. आपल्याला शक्य होतं, म्हणून आपण ते केलं , या भावनेतूनच हे सारं सुरु असत. कदाचित यामुळेच त्यांनी एक आवाज दिला की जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून त्याला प्रतिसाद मिळतोच.
सुभाष राऊत यामुळेच प्रत्येकाला आपले वाटतात , अनेकदा  इतर नेत्यांकडे जाताना कार्यकर्त्यांना संकोचल्यासारखं होतं , पण सुभाष राऊत यांच्याबद्दल तसं काढी होत नाही. घरातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करताना कधी अवघडल्यासारखं होत नाही. त्यांना आपल्या सुख दुःखात सहभागाई करून घेताना कधी वेगळं वाटत नाही. असं एक वेगळं नातं त्यांनी प्रत्येकासोबत निर्माण केलं आहे. कार्यकर्त्याला कोणत्याही वेळी उपलब्ध होणार हा नेता आहे.आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शब्दाला कार्यकर्ता साथ देत असतो.

भुजबळ साहेबांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम बीड शहरात घेण्याचे ठरले. त्यावेळी तो कार्यक्रम कोठे घ्यायचा यावर चर्चा सुरु होती. ’आपण स्टेडियम ला कार्यक्रम घ्यायचा ’ असं भाऊ म्हणाले. अर्थात बीडच्या स्टेडिअमवर कार्यक्रम घेणे सोपी गोष्ट नाही. स्टेडियम भरवणे भल्याभल्यांना शक्य होत नाही, पण भाऊंचा आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास होता. भाऊंनी स्टेडिअमवरच कार्यक्रम घ्यायचे ठरवले आणि स्टेडियम भरवून देखील दाखवले . आपल्या नेत्याचा आदर आपण कसा करायचा असतो, आपल्या नेत्याचा सन्मान कसा करायचा असतो, हे भाऊंनी दाखवून दिलं . या मेळाव्याची दखल स्वतः शरद पवारांनी घेतली . भाऊंच संघटन कौशल्य हे असं आहे. त्यांच्याबद्दल आणखीही खूप काही लिहिता येईल. पण खरं सांगायचं तर शब्दात बांधता येईल असं हे व्यक्तिमत्व नाहीच. सर्वांसाठी खराखुरा आधार असणार्‍या या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा . 

 

Advertisement

Advertisement