Advertisement

लालपरी पुन्हा धावणार 

प्रजापत्र | Saturday, 05/06/2021
बातमी शेअर करा

 बीड-कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात एसटी बस सेवा बंद होती.मात्र आता कोरोनाची रुग्ण संख्या घटली असल्याने सोमवारपासून (दि.७) पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावणार आहे. या संदर्भात विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी माहिती दिली आहे. 

     सोमवारी सकाळपासून एसटी बसला राज्यांतर्गत प्रवासासाठी मुभा देण्यात आली असून बीड जिल्ह्यातील सर्व आगारातून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे.यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून बसमध्ये मास्क वापरणे प्रत्येकाला अनिवार्य असणार आहे. 

 

या मार्गावर धावणार बस 

बीड आगार-परळी,नांदेड,परभणी,अंबाजोगाई,लातूर,औरंगाबाद,जालना,

सोलापूर,पुणे,मुंबई 

 

परळी आगार-बीड,परभणी,लातूर,अंबाजोगाई,नांदेड,सोनपेठ 

 

धारूर आगार-बीड,अंबाजोगाई,केज,तेलगाव,पुणे 

 

माजलगाव आगार-लातूर,परळी,परभणी,नांदेड,सोलापूर,कोल्हापूर,बीड-मुंबई,गेवराई,आष्टी 

 

गेवराई आगार-माजलगाव,परभणी,नांदेड,शेगाव,पुणे,जालना,औरंगाबाद

 

पाटोदा आगार-पुणे,बीड,परळी,मुंबई 

 

आष्टी आगार-पुणे (स्वारगेट),नगर,मुंबई 

 

अंबाजोगाई आगार-बीड,परळी,औरंगाबाद,लातूर,अहमदनगर,पुणे,धारूर,परभणी

Advertisement

Advertisement