गेवराई-गेवराई पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात एका वकीलाविरोधात त्याच्याच पक्षकार महिलेनं आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली होती.याप्रकरणी आरोपी इंदर नागरेला अटक गेवराई उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने अटक केली.
इंदर भगीरथ नागरे (वय-४० रा.संगम जळगाव हल्ली मुक्काम शिवाई नगरी गेवराई) असे या आरोपीचे नाव असून ते व्यवसायाने वकील आहे.सन २०१६ मध्ये गेवराई शहरातील एका परितक्त्या महिलेच्या प्रकरणात विधी सेवा समितीमार्फत सरकारी वकील म्हणून नागरेची नेमणूक करण्यात आली होती.यानंतर नागरेने त्या महिलेला पैसे आणि कामाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला.याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर पोलीस उपविभागीय अधीकारी यांच्या पथकाने सदर प्रकरणातील आरोपीला राहत्या घरातून अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी स्वप्नील राठोड हे करीत आहेत
प्रजापत्र | Friday, 14/08/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा