Advertisement

  मोर्चाचं नाव काढलं की लोक म्हणतात विधानपरिषद आली वाटत

प्रजापत्र | Friday, 04/06/2021
बातमी शेअर करा

परळी- आ.मेटेंच्या मराठा आरक्षण मोर्चावरून जिल्ह्यातील वातावरण तापलेले असतानाच यात आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील उडी घेतली आहे. गोपीनाथ गडावर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी 'आता कोणी मोर्चा काढणार म्हटलं की लोक म्हणतात विधान परिषद आली वाटत ' असे विधान केले आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात पंकजा मुंडेंनी कोणाचे नाव घेतले नसले तरी हा आ. विनायक मेटे यांनाच टोला असल्याचे लोक बोलत आहेत.

 

गोपीनाथ गडावर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी 'सध्या लोक जातीजातीत विभागले गेले आहेत, आरक्षणाच्या नावाखाली ही दरी वाढत आहे. काही लोक यातून आपली पोळी भाजून घेत आहेत , मात्र आता कोणी मोर्चा काढणार म्हटलं की लोक विधान परिषद आली वाटत ' असे म्हणतात. असे म्हटले आहे.जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि आ. विनायक मेटे यांच्यातील संबंध सर्वांना माहित आहेत. त्यामुळे आ. विनायक मेटे यांचा मोर्चा निघण्याच्या अगोदर पंकजा मुंडे यांनी केलेले हे विधान ही थेट आ. मेटेंना कोपरखळी मानली जात आहे. आ. मेटे शिवसंग्रामचे अध्यक्ष असले तरी ते भाजपचे आमदार आहेत, आणि या मोर्चाला भाजपकडून देखील कुमक होत आहे. स्वतः माजी आमदार नरेंद्र पाटील हे मोर्चासाठी झटत आहेत. या  पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंची ही भूमिका महत्वाची मानली जात आहे.
 

Advertisement

Advertisement