बीड-मराठा आरक्षण प्रश्नावर बीड येथे 5 जून रोजी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे जनतेने रस्त्यावर येऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा ईशारा बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे .
बीड येथे आयोजित मराठा मोर्चाला प्रशासनाकडून कोणतीच परवानगी दिलेली नाही .कोरोना नियम आणि निर्बंध याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जगताप यांनी ही माहिती दिली .
सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे,शासनाने लॉक डाऊन,संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे .आरक्षण विषयावर आयोजित मोर्चामुळे नियमांची पायमल्ली होऊ शकते.त्यामुळे जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले.
बातमी शेअर करा