बीड-मान्सूनपूर्व सरींनी तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. शेतकर्यांकडून खरीप मशागतीची कामे पूर्ण होत असतानाच रोहिणी नक्षत्रात वेळेवर पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी कुलाबा वेधशाळेच्या अहवालातून जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वार्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या दोन दिवसात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १३.२ टक्के मी.मी पाऊस झाला आहे.
गतवर्षीपासून महावेध कडून महसूल मंडळनिहाय दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी केली जाते. जिल्ह्यात 1 व 2 जूनला सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसादरम्यान वादळीवार्यामुळे काही ठिकाणी फळपिकांचे नुकसान झाले. अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 25.4 टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील अकराही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसात 13.2 टक्के मी.मी इतका पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस:
बीड-5.2 मी.मी, पाटोदा-8.7मी.मी टक्के, आष्टी-6.8 मी.मी, गेवराई- 19.7 मी.मी, माजलगाव-12.1मी.मी, अंबाजोगाई-25.4 मी.मी, केज-14.6 मी.मी, परळी-13.2 मी.मी,धारुर-२३.५ मी.मी, वडवणी-8.8 मी.मी आणि शिरुर (कासार) तालुक्यात १४ टक्के मी.मी पाऊस झाला आहे.