Advertisement

अर्ध्या दिवसात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 12/08/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाग्रस्त मृत्युला थोड्या फार ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण होताच मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत तब्बल सहा जणांचे मृत्यु झाले आहेत.यामध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश असून मृत व्यक्ती अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार घेत होते.  

परळीतील शांतीनगर भागातील ६८ वर्षीय महिलेस सोमवारी सायंकाळी उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा मंगळवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथील ६० वर्षीय पुरूषाला रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा मंगळवारी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील देशपांडे गल्लीतील रूग्णास मंगळवारी रात्री दहा वाजता दाखल केले होते. त्या रूग्णाचा बुधवारी पहाटे १.४० वाजता मृत्यू झाला. स्वाराती रूग्णालय परिसरातील शनिवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ६१ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री ८.२० वाजता मृत्यू झाला. केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईतील झारे गल्लीतील मंगळवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement