बीड-राज्यात कोरोनाच्या नावाखाली जे निर्बंध आहेत, त्यात आता केवळ अत्यावश म्हणवणार्या काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडाले आहेत. रोजच कमवायचं आणि खायचं अशी परिस्थिती असलेल्या हजारो लोकांसमोर आता जगायचाच प्रश्न निर्माण झाला आहे. या बंदमुळे कोरोनाने मरण्याची नव्हे तर जगायचं कस याचीच भीती वाटू लागली असल्याच्या भावना लोक व्यक्त करीत आहेत .
राज्यात कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली सध्या व्यवसायांवर बंधने आहेत. बीड जिल्ह्यात तर कालपर्यंत अत्यावश्यक म्हणवल्या जाणार्या व्यवसायांना देखील कुळूउप लावण्यात आले होते. तर इतर ज्यांचे हातावर पोट आहे अशांच्या रोजगाराबद्दल बोलायला कोणीच तयार नाही. चपला बूट शिवणारांपासून ते केश कर्तनालयापर्यंत सारेच व्यवसाय बंद आहेत. गॅरेज , हॉटेल, छोट्या टपर्या, कटलरी अशा व्यवसायांवर मोठ्याप्रमाणावर लोक अवलंबून आहेत. या सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मागील 2 महिन्यांपासून या सर्वांचा रोजगार बंद आहजे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही, उधार उसनवार किती दिवस करायची यालाही मर्यादा आहेत. आता कोणी उसने पैसे द्यायला देखील तयार नाही. अशा परिस्थितीत जगायचं कस हाच प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. कोरोनाने मारुती किंवा नाही हे माहित नाही , पण लाचारीने आणि रोज कोणापुढे तरी हात पसरून जगायची आता भीती वाटत आहे अशा भावना लोक व्यक्त करीत आहेत. याचा विचार मायबाप सरकारने करणे आवश्यक असून, अत्यावशक, अनावश्यक असला भेद न करता सारेच व्यवसाय उघडावीत अशी मागणी होत आहे.
प्रजापत्र | Tuesday, 01/06/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा