बीड : मागील महिनाभरापासून बंद असलेली जिल्ह्यातील किराणासह अत्यावश्यक सेवेतील बेकरी, मांस विक्री दुकाने , फळे भाजीपाला विक्री आता आजपासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु राहणार आहे. तर खाते बियाणे विक्रीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे आदेश काढले आहेत.
राज्यभरातच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जात असून बीडच्या जिल्हा प्रशासनाने देखील मागील महिनाभरापासून जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून नागरिकांची काहीशी सुटका केली आहे. आजपासून जिल्ह्यातील किराणा , फळे, भाजीपाला, मांस , बेकरी पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत करता येणार आहे. तर बँका पूर्णवेळ उघड्या राहणार आहेत. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांसाठी सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत उघडी राहणार असून शासकीय कार्यालयात सुद्धा २५ % उपस्थिती असणार आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील बाजारसमित्यांना त्यांचे कारभार सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत करता येणार असून स्वस्त धान्य दुकाने देखील २ वाजे पर्यंत सुरु राहतील.
---
विकेंड लॉकडाऊन
असे असले तरी जिल्ह्यात आणखी २ आठवडे विकेंड लॉकडाऊन असणार आहे. म्हणजे शनिवारी आणि रविवारी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.