Advertisement

31 पर्यंत बीडमध्ये लॉकडाऊन ही अफवा , शहरं या तारखेपर्यंतच राहणार बंद

प्रजापत्र | Tuesday, 11/08/2020
बातमी शेअर करा

बीड -जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बुधवारपासून बीडसह सहा तालुके लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 ऑगस्टपर्यंत हा लॉकडाऊन असून सध्या सोशल मीडियावर 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढला असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.मात्र यात तथ्य नसून आजघडीला तरी 21 ऑगस्टपर्यंतचाच निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे.
    सध्या सोशल मीडियावर जिल्हाधिकारी यांची एक ऑर्डर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यात 31 तारखेपर्यंत लॉकडाऊनचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.मात्र प्रत्यक्षात त्या ऑर्डरमध्ये राज्य शासनाने 31 तारखेपर्यंत lockdown सांगिल्याचा उल्लेख आहे, तो राज्यभरात जे निर्बंध आहेत त्यासाठी आहे. जिल्हाधिकारी बीड यांचा तो आदेश श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी, ऋषीपंचमीला गर्दी होऊ यासाठीचा जमावबंदी आदेश आहे. यात कुठेही 31 तारखेपर्यंत सहा शहरे संपुर्णपणे बंद  ठेवण्याचा किंवा या सहा शहरात ३१ तारखेपर्यंत संचारबंदी लावण्याचा उल्लेख नाही. तसेच कालच पालकमंत्र्यांनी देखिल हा दहा दिवसाचा lockdown शेवटचा ठरावा असे म्हटले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढला असल्याच्या सध्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये कुठलेही तथ्य आढळून येत नाही. Lockdown दहा दिवसांचाच म्हणजे २१ तारखेपर्यंतच आहे.

Advertisement

Advertisement