बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात घटला असून बीड तालुका वगळता इतर तालुक्यात कोरोनाची घसरण सुरु आहे.गुरुवारी (दि.२७) आरोग्य विभागाच्या अहवालात जिल्ह्यात केवळ ६०३ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ४९८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ही घटायला सुरुवात झाली आहे.सध्या कोरोनाबाधितांची संख्या बीड तालुक्यात मोठी आहे.गुरुवारच्या अहवालात अंबाजोगाई ५५,आष्टी ९७,बीड १६५,धारूर ३०,गेवराई ५८ केज ६५,माजलगाव ५०,परळी १२ पाटोदा २६ शिरूर ४९,वडवणी १४ रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान गुरुवारी बीड तालुक्यात नव्या रुग्णांची संख्या १६५ वर आली असल्याने काहीसा दिलासा मिळाला असून ही संख्या मागील काही दिवसांत २०० च्या पुढे होती.तसेच आजचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ही १० वर आला आहे.पुढील काही दिवस याच पद्धतीने पॉझिटिव्हिटी रेट राहिला तर बीड जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा