Advertisement

धारूरमध्ये पाच दुकाने दंडात्मक कारवाई करून केली सील

प्रजापत्र | Wednesday, 26/05/2021
बातमी शेअर करा

धारूर -शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणारी पाच दुकाने आज प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून सील केली. तहसील, पोलीस आणि नगरपरिषद अशा तीन यंत्रणेच्या संयुक मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या पाच दुकानात शहरातील नामवंत सराफा व्यापाऱ्याच्या दुकानाचा समावेश आहे.

 

 

 धारूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. यास प्रशासकीय यंञणेचा ढिला कारभार जबाबदार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, बुधवारी तहसील, पोलीस आणि नगरपरिषद या यंञणा खडबडून जाग्या झाल्या. शहरात संयुक्त मोहीम राबवत नियम मोडणाऱ्यांवर पथकाने कारवाई केली. पथकाने शहरातील नामवंत ज्वेलर्सच्या दुकानासह इतर चार दुकाने सील करून दंड लावला. पथकाने नागरिकांना नियमांचे  पालन करण्याचे आवाहन केले.

 

 

पाच दुकाने सिल केल्याने बाजारपेठेत काही क्षणात शुकशूकाट पसरला. या कारवाईत तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक कानीफनाथ पालवे, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी नितिन बागूल आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 

Advertisement

Advertisement