Advertisement

कोरोना रुग्णाची गळफास घेऊन दीप हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 21/05/2021
बातमी शेअर करा

बीड-गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे. 
रामलिंग महादेव सानप (वय ३५ रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची घेतली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान तणावातून या रुग्णाने आत्महत्या केली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

 

Advertisement

Advertisement