Advertisement

बीड :युके स्ट्रेन म्हणून ओळखल्या जाणारा आणि अँटीबॉडी निष्क्रिय करणारा कोरोनाचा घातक स्त्रें महाराष्ट्रात हायपाय पसरत आहे. राज्यातून जीनोम तपासणीसाठी घेतलेल्या ५२ % नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे. मात्र या स्ट्रेनच्या जीनोम तपासणीसाठी बीड जिल्ह्याने सॅम्पलच पाठविले नसल्याचे समोर आले आहे. देशभरातून कोरोनाची घातकता लक्षात यावी यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केली जात असताना बीड जिल्ह्याने मात्र मार्च नंतर यासाठी एकही सॅम्पल पाठविले नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यात तो घातक स्ट्रेन आहे की नाही हे समजू शकलेले नाही. राज्य स्तरावरून बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना वारंवार सूचना देऊनही बीडचे आरोग्य प्रशासन जीनोम सिक्वेन्सिंग करीत नसल्याचे चित्र आहे. 

 

कोरोनाच्या विषाणूमध्ये सातत्याने बदल (म्युटेशन )
 होत असतात. सध्या जगभरात कोरोनाचा युके स्ट्रेन म्हणून ओळखला जाणारा (बी. १ . ६१७ ) स्ट्रेन सर्वात घातक मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याला घातक स्ट्रेन जाहीर केले आहे. यात देखील तीन म्युटेशन झाले आहेत . यातील दुसऱ्या म्युटेशनचा धोका देशातील काही राज्यांमध्ये वाढला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये हा स्ट्रेन वाढत असल्याचे राष्ट्रीय रोगनिवारण केंद्राने जीनोम सिक्वेन्सिंग च्या अहवालाआधारे सांगितले आहे.

 

महाराष्ट्रात घेतलेल्या नमुन्यांमध्ये मार्च महिन्यात या स्ट्रेनचे प्रमाण १७ % आढळले होते ते प्रमाण एप्रिलमध्ये ५२ % आढळले आहे. हा स्ट्रेन व्यक्तीच्या एच बॉन्डींग आणि सॉल्ट ब्रिज प्रक्रियेवर आघात करतो आणि शरीरातील अँटीबॉडी निष्क्रिय करतो. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला किंवा लस घेतलेल्या देखील पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढले असावेत असेही राष्ट्रीय रोगनिवारण केंद्राने म्हटले आहे.
राज्यभरातून या स्ट्रेनचा प्रभाव किंवा संसर्ग जिल्ह्यात पसरला आहे का हे पाहण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केले जाते. विषाणू प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रुग्णाच्या स्वाबचे नमुने पाठवून ही तपासणी होते. जिल्ह्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात नमुने पाठवावेत अशा सूचना आहेत. मात्र बीड जिल्ह्याने मार्च महिन्यानंतर यासाठी एकही सॅम्पल पाठविलेले नाही. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत , अशावेळी रुग्णांमध्ये कोणता स्ट्रेन आहे हे काळाने महत्वाचे असते , मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांना या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 

Advertisement

Advertisement