Advertisement

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून केंद्र सरकारने खतांचे भाव दीडपट वाढविले-डक

प्रजापत्र | Sunday, 16/05/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण हवालदिल झालेले असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून केंद्र सरकारने खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत,असा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केला आहे.या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. 

 

             सभापती अशोक डक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केलेली आहे.कोरोनामुळे सर्व ठप्प असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले,अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहेत केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खताची भाववाढ केली आहे एकीकडे आधीच कोरोना महामारी चे संकट असताना खतांचे भाव दाम दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल सरकारने कर्मचारी व अनेकांना कोविड योद्धा पुरस्कार जाहीर केले विमा कवच दिले मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही बाजारभावाची कोणतीही हमी नाही त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे आस्मानी संकट पाचवीला पुजले असताना आता सुलतानी संकट डोक्यावर लादले आहे अशी टीकाही अशोक डक यांनी केली ११०० रुपयांचे डीएपी खत १९०० रुपये झाले यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल ६५ रुपये रुपयांचे डिझेल ९२ रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणे ही कठीण काळात कठीण झाले आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार याचा विचार केंद्रातील राज्यकर्त्यांनी करावा असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले.

Advertisement

Advertisement