Advertisement

बीडच्या मोंढयात मोडला गर्दीचा उच्चांक, lockdown धाब्यावर

प्रजापत्र | Tuesday, 11/05/2021
बातमी शेअर करा

बीडः प्रशासनाने बीड जिल्ह्यात lockdown मधुन दोन दिवसांसाठी काहिशी सवलत देताच मंगळवारी सकाळीच बीडच्या मोंढा भागात गर्दीचे सारे उच्चांक मोडले गेले. वाहतुकीची कोंडी सोडविणे अवघड जावे इतकी गर्दी मोंढा भागात पहायला मिळाली.
प्रशासनाने मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस सकाळचे ३ तास lockdown मध्ये काहिशी शिथीलता दिली होती आणि किराणा दुकाने उघडायला परवानगी दिली होती. मात्र या सवलतीचा गर्दीने गैरफायदा उठविल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्वच दुकानांवर झालेली प्रचंड गर्दी कोरोना संक्रमणाला निमंत्रण देणारी ठरु शकते. ही गर्दी आवरण्यात पोलीस आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरले.
जिल्ह्यात कोरोना संक्रमण सातत्याने वाढत असून या काळात जनतेने अधिक सतर्कता आणि काळजी घेण्याची गरज आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी गर्दीत जाणे प्रत्येकाने टाळण्याची गरज आहे.

Advertisement

Advertisement