Advertisement

कोरोनाची शतकी खेळी, १०८ positive

प्रजापत्र | Wednesday, 05/08/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा पसारा वाढत असुन बुधवारी कोरोनाचे 108हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता सक्रीय रुग्णांचा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बुधवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण गेवराई तालुक्यातील ३५ , तर बीड १४, अंबाजोगाई ६, परळी २९, माजलगाव६,केेज ११,धारूर १,पाटोदा १,आष्टी ५ रुग्ण आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख अजूनही चढतीवर आहे. बुधवारी जिल्ह्यात आत्तापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. बुधवारी पाठविलेल्या अहवालापैकी तब्बल १०८ नमुने पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे आता सक्रीय रुग्णांचा आकडा पाचशे पार झाला आहे. तरीही दिलासादायक बाब म्हणजे यातील गंभीर रुग्णांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. मिळालेल्या माहितीनूसार या आकडेवाडीत 16 रुग्ण गंभीर असून 42 रुग्ण मध्यम स्वरुपाच्या तक्रारीचे आहेत. तर तीनशेहून अधिक रुग्णांना कसलीच लक्षणे नाहीत.
बुधवारी गेवराई शहरात व्यापार्‍यांची अ‍ॅटीजन तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका प्रशासन, महसुल प्रशासन, वैद्यकीय अधिक्षक, व्यापारी महासंघ व विविध व्यापारी संघटनांच्या सहकार्‍यातून तब्बल 1310 व्यावसायीक कामगार, बँक कर्मचारी आदींची तपासणी सहा केंद्रांवर झाली. यात 28 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 

 

धारुर, केज पाळणार बंद
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धारुर आणि केज शहरात सहा दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय स्थानिक व्यापार्‍यांनी घेतला आहे. धारुर शहरात असाही अर्धाभाग कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. तर केज शहरातील रुग्णांची संख्या मागच्या दोन दिवसात वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी संघटनांनी बैठका घेवून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घोषीत केला आहे.

 

धारुरात कोव्हिड योध्दे क्वारंटाईन
शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या कोविड-19 च्या उद्रेकामुळे  अनेक कोविड योध्द्यांना कोरोंटाईन होण्याची वेळ आली आहे. यात प्रामुख्याने पोलिस, डॉक्टर व नगर परिषदेचे कर्मचारी यांचा समावेश आहे.यात स्वतः सहाय्यक  पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक अशा चार पोलिस अधिकार्‍यासह 16 पोलिस कर्मचारी, पाच डॉक्टर, चार नगर परिषद कर्मचारी कोरोंटाईन झाले आहेत.

Advertisement

Advertisement