Advertisement

आज दिवसभरातील महत्वाच्या पाच बातम्या

प्रजापत्र | Monday, 10/05/2021
बातमी शेअर करा

◆ महाराष्ट्र लॉकडाऊन: 15 मे नंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार?

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये लक्षणीयरीत्या कमी होत आहे. तेव्हा अशा परिस्थितीत 15 मेनंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार की उठवला जाणार? असा मोठा प्रश्न आहे.

राज्यातील लॉकडाऊनची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाऊनबाबतचा निर्णय येत्या 15 तारखेला घेतला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

ते म्हणाले, "काही जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. राज्याच्या लॉकडाऊनचा निर्णय येत्या काही दिवसांत घेऊ. तसंच राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी झालेला नसून आजही 50-60 हजार नवीन रुग्नांची नोंद होत आहे."

लॉकडाऊनचा निर्णय 15 तारखेनंतरच घेतला जाईल अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

◆ उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा हेल्मेट आणि मास्क सक्ती

बीड : राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे  सामान्य जनता त्रस्त असताना आणि बंद काळात हेल्मेट मिळणे अवघड झालेले असतानाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकदा मास्क आणि हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत . कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती राबवा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोरोना संदर्भाने सोमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हेल्मेट आणि मास्क सक्तीचे आदेश दिले होते . मात्र सध्या अनेकांकडे हेल्मेटच उपलब्ध नसल्याने अनेक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीला जनतेचा विरोध होत आहे. हा विरोध लक्षात घेऊनच औरंगाबाद  पोलिसांनी हेल्मेट सक्तीची कारवाई १५ मे पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र उच्च न्यायालयाने यासंदर्भात पुन्हा पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हेल्मेट आणि मास्क आवश्यक असल्याचे सांगत जनतेला स्वतःला शिस्त नाही, म्हणून आम्हाला जनतेला शिस्त लावावी लागत आहे, जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती आणि मास्क सक्ती राबवा असे आदेश दिला आहे.

 

Advertisement

Advertisement