Advertisement

बीडमध्ये बदलले लसीकरणाचे ठिकाण

प्रजापत्र | Thursday, 06/05/2021
बातमी शेअर करा

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि त्यातून उडणारा गोंधळ लक्षात घेता आता आरोग्य विभागाने बीड शहरासाठीचे लसीकरणाचे केंद्र बदलले आहे. आजपासून जिल्हा रुग्णालयाऐवजी नगर रोडवरील चंपावती प्राथमिक शाळेत लसीकरण केले जाणार आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात बीड शहरासाठीचे लसीकरण सुरु होते. मात्र आता चंपावती प्राथमिक विद्यालयात सकाळी 9 ते सायं.5 या काळात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन वेळ घेवूनच लसीकरणासाठी जावे लागणार असून 45 पेक्षा जास्त वय असणारे नागरीक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंेदणी करु शकतील. त्या ठिकाणी एका दिवशी 200 व्यक्तींना लस दिली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे.

 

Advertisement

Advertisement