बीड : माजलगाव तालुक्यात रेमडीसेविर इंजेक्शनचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. नोंदणी करून ४ दिवस उलटूनही इंजेक्शन मिळत नाही, तर यादीत नाव आल्यानंतरही २४ तास इंजेक्शन मिळत नाही. यामुळे सोमवारी माजलगाव तहसीलमध्ये मनोज फरके यांच्या नेतृत्वात रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.
माजलगाव तालुक्यात रेमडीसेविर्च्या वितरणात मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याची परिस्थिती आहे . प्रशासन वेळेवर इंजेक्शन देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यांनी बीडमध्ये नोंदणी केली होती, त्यांना अद्याप इंजेक्शन मिळालेले नाही तसेच माजलगाव मध्ये नोंदणी करून किंवा हॉस्पिटलने मागणी नोंदवून देखिल वेळेवर इंजेक्शन मिळत नसल्याने सोमवारी मनोज फरके यांच्या नेतृत्वात मजळगावमधील रुग्णांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला . आता इंजेक्शनसाठी ठिय्या देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे.
बातमी शेअर करा