Advertisement

रेमडीसेविरसाठी जिल्ह्याला खेटे घालायची गरज नाही

प्रजापत्र | Sunday, 25/04/2021
बातमी शेअर करा

बीड – रेमडीसेविर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी चांगलेच मनावर घेतले असून उद्यापासून तालुक्यातील लोकांना बीडला येऊन नोंदणी करण्याची गरज नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर यादी पाठवतील आणि त्यांना स्टोक मिळून जाईल .

 

 

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडीसेविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांची पंधरा दिवसापासून धडपड सुरू आहे .शेकडो लोकांना इंजेक्शन साठी खेटे घालावे लागत आहेत .प्रशासन आणि पुढारी यांच्यात बेबनाव देखील निर्माण झाला .

 

 

अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कुचकामी आहेत हे उघडे पडले,या नालायक अधिकाऱ्यामुळे इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे समोर आले,त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी ही सगळी जबाबदारी प्रवीण धरमकर यांच्यावर दिली .

 

 

धरमकर यांनी याबाबत नुकताच एक आदेश काढला आसून तालुकास्तरावर लोकांनी आता सोमवार पासून बीडला आयटीआय ला येऊन नोंदणी करण्याची गरज राहिलेली नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर ही माहिती बीडला पाठवतील,बीडला इंजेक्शन उपलब्ध झाले की तालुक्याचा कोटा पाठवून दिला जाईल,तो नातेवाईकांना वितरित केला जाईल असे उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी म्हटले आहे .

 

Advertisement

Advertisement