Advertisement

अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्ण दगावले

प्रजापत्र | Saturday, 24/04/2021
बातमी शेअर करा

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

बीड-येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात व्यवस्थापना अनागोंदी रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. शनिवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने येथील ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचा प्रकार समोर आला . यात दोन रुग्ण दगावले आहेत. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेल्याचे मान्य केले असले तरी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचे मात्र नाकारले आहे. 
            बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलच्या वॉर्ड क्र.७ मध्ये सकाळी अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. हा ऑक्सिजन पुरवठा कोणी बंद केला हे अद्यापही प्रश्नाला कळलेले नाही. दरम्यान त्याच कोविड वार्डातील २ कोरोना रुग्णांनाच मृत्यू झाला. आता हा मृत्यू ऑक्सिजनभावी झाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर आरोग्य विभाग मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याचे मान्य करीत असला तरी रुग्णांचे मृत्यू केवळ ऑक्सिजनभावी झाल्याचे स्वीकारायला तयार नाही. 
आरोग्य विभाग भलेही मृत्यूचे कारण ऑक्सिजन नाही असे म्हणत असेल, मात्र अशा कठीण प्रसंगात कोणीही ऑक्सिजन पुरवठा बंद करणार असेल आणि ऑक्सिजन पुरवठा कोण बंद करतोय हे देखील रुग्णालय प्रशासनाला कळत नसेल तर रुग्णालयाच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालय प्रशासन नेमके काय करतेय हा प्रश्न कायम आहे.

 

Advertisement

Advertisement