Advertisement

 रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी इथे करावी लागणार नोंदणी 

प्रजापत्र | Thursday, 22/04/2021
बातमी शेअर करा

बीड-सध्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून अनेक रुग्णांना इंजेक्शनासाठी वाट पाहावी लागत आहे.आता यापुढे  इंजेक्शन हवे असल्यास आयटीआयमध्ये आधी नोंदणी करावी लागणार असून नंतर इंजेक्शन उपल्बध झाल्यास आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात येणार आहे. 

 

             बीड शहरातील नगर रोडवर असणाऱ्या आयटीआय  कोव्हिड सेंटरमध्ये बुधवार (दि.२१) पासून रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.सकाळी १० ते संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत इथे नोंदणी करता येणार असून त्यासाठी सिटी स्कॅन स्कोर रिपोर्ट झेरॉक्स,रुग्णाचे आधार कार्ड झेरॉक्स,डॉक्टर यांच्याकडून रेमडीसीवीर मागणी पत्र (प्रिस्क्रिप्शन) शासकीय नमुन्यातील आपल्या अर्जासोबत असणे बंधनकारक आहे.

 

ही सर्व कागदपत्रे दाखल करून घेतल्यानंतर औषध उपलब्ध झाले आरोग्य विभागाच्या वतीने संपर्क करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अडचणीसाठी 8446165371 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान ज्यावेळी इंजेक्शन घेण्यासाठी बोलविण्यात येईल, त्यावेळी स्वतः चे आधार कार्डाची एक झेरॉक्स आणणे बंधनकारक असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले

Advertisement

Advertisement