Advertisement

 धक्कादायक, 'स्वराती'त १६ तासात ११ मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 21/04/2021
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई : येथील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्युदर कमी होण्याचे नाव घेत नसून रुग्णालयात मागील १६ तासात तब्बल ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठ्याअभावी झाल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत, मात्र रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. रुग्णालयात पुरुष प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी म्हटले आहे.

 

येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना बळी जाण्याचे प्रमाण मोठे आहे. बुधवारी  देखील रुग्णालयात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. बुधवारी मध्यरात्रीनंतर दुपारी ४ वाजेपयंत रुग्णालयात तब्बल ११ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद पडला आणि त्यामुळे रुग्ण दगावल्याची रुग्णांचे नातेवाईक सोशल मीडियावर सांगत आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे. रुग्णालयात लोखंडी सावरगाव, बीड, लातूर आदी ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा सुरु असून रुग्णालयात सध्या पुरेसा ऑक्सिजन आहे. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनभावी झालेला नसून दगावले रुग्ण साठीच्या पुढचे तसेच सह्व्याधी असणारे होते आणि रुग्णालयात दाखल करतानाच यातील अनेकांची परिस्थिती गंभीर होती असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे. 

Advertisement

Advertisement