बीडः बीडसह संपूर्ण मराठवाडयाला प्रतिक्षा असलेली रेमडिसेविरच्या १० हजार इंजेक्शनची खेप पुन्हा एकदा तांत्रिक कारणात अडकली आहे. औषध प्रशासनाकडून वेळेत परवानगी नगेल्याने हे इंजेक्शन मंगळवारी रात्री पोहचु शकले नाहीत. दरम्यान माणसाच्या जिवापेक्षा तांत्रिक गोष्टी महत्वाच्या ठरायला नकोत अशी प्रतिक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली असून आज आपण या विषयात पुन्हा संबंधित मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालकांना भेटून आज रात्रीपर्यंत तरी इंजेक्शन मिळावेत यासाठी प्रयत्न करित असल्याचे म्हटले आहे.
बंगळुरू स्थित कंपनितून मराठवाड्यासह लगतच्या बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यात १० हजार रेमडिसेविर चा पुरवठा व्हावा यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आठवडाभरापासून पाठपुरावा करित आहेत. कंपनिने ४ दिवसांपूर्वी च हे इंजेक्शन पुरविण्याचा शब्द दिला होता. मात्र यात मुंबईत समोर आलेल्या साठेबाजी प्रकरणामुळे काहिसा अडथळा आला. त्यानंतर मंगळवारी हा पुरवठा अपेक्षित होता, मात्र तेथेही औषध प्रशासनाकडून वेळेत तांत्रिक परवानग्या गेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारचा मुहूर्त देखील टळला. आता या विभागाच्या आयुक्तांची बदली करण्यात आली असून तांत्रिक बाबी पूर्ण होऊन आज रात्री उशिरापर्यंत हे इंजेक्शन मिळतील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान 'मी मागील आठ दिवसांपासून पाठपुरावा करतोय.पण तांत्रिक अडचणित पुरवठा अडकतोय. माणसे मरत असताना असल्या तांत्रिक बाबींचा खेळ अपेक्षित नाही. माणसांच्या जिवापेक्षा तांत्रिक बाबी महत्वातच्या नाहित.
मी क्वारंटाईनमध्ये होतो म्हणून प्रत्येकाशी फोनवर बोलत होतो, मात्र आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने यांची भेट घेणार असून आज रात्री पर्यंत तरी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे' असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.