Advertisement

माजलगाव मध्ये १३५ जणांची ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट

प्रजापत्र | Monday, 19/04/2021
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१९ - राज्यात संपूर्ण संचारबंदी असतानाही लोक बेशिस्तपणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर माजलगाव प्रशासनाने एक नामी शक्कल लढवत रहदारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.

 

              विनाकारण घराच्या बाहेर पडू नका म्हणून प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केल्या जात आहे. परंतु लोक त्याला कसलाच प्रतिसाद न देता घराच्या बाहेत पडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे लोकांना जरब बसावी यासाठी माजलगाव च्या तहसीलदार वैशाली पाटील व नगर परिषदचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी एक परिपत्रक काढून विनाकारण कुणी बाहेर दिसले तर जाग्यावर अँटीजन टेस्ट करून पॉजि टिव्ह अहवाल आला तर तात्काळ रुग्णालयात भरती केले जाईल असे सूचित करण्यात आले होते.

 

               त्यानुसार रविवारी सदरील उपक्रमाला प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली तेंव्हा आवाहनाला न जुमानता बेशिस्त लोक घराच्या बाहेर पडले होते. मात्र ते जेंव्हा बाहेर आले तेंव्हा शहरातील बसस्थानक, पोलीस ठाणे तसेच छत्रपती शिवाजी चौकात त्यांची धरपकड करून आहेत त्या ठिकाणी त्यांची टेस्ट करण्यात आली. रविवारी असे एकूण 135 लोकांवर कारवाई केली त्यामध्ये 5 व्यक्ती पॉजि टिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना तात्काळ कोरोना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. 

 

        सदरील मोहिमेत पोनि श्री. फराटे, मुख्यधिकारी विशाल भोसले, सपोनि अविनाश राठोड,पीएसआय श्री. भटकर, जगदीश जाधवर, संतोष घाडगे यांनी सहभाग घेतला.
                दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर ''धरपकड अन टेस्ट कर' अशी कारवाई सुरू झाली असता इतरांनी धूम ठोकल्याने प्रशासनाची सदरील मात्रा लागू पडल्याचे दिसून आले आणि कांही वेळातच रस्ते निर्मनुष्य झाले असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली. तर सदरील उपक्रम नियमित चालू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Advertisement

Advertisement