Advertisement

अंबाजोगाई बाजार समितीवर पुन्हा येणार प्रशासक

प्रजापत्र | Thursday, 15/04/2021
बातमी शेअर करा

संचालक मंडळाची मुदतवाढीचा मागणी फेटाळली
बीड : भाजपचे वर्चस्व असलेल्या अंबाजोगाई बाजार समितीवर आता पुन्हा प्रशासक येणार आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेली मुदतवाढीचा मागणी करणारी याचिका राज्याच्या सहकार मंत्र्यांनी फेटाळली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने मागील महिन्यात मुदतवाढीचा  तशी याचिका सहकार मंत्र्यांकडे दिली होती.
अंबाजोगाई बाजार समितीवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे.

 

 

या बाजार समितीच्या संचालक मंडळाची सप्टेंबर २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाकाळात निवडणूक शक्य नसल्याने ऑकटोबर २०२० मध्ये राज्य सरकारने या बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमले होते. मात्र याला बाजार समितीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या प्रशासक मंडळ नियुक्तीला आव्हान दिले होते. त्यानंतर १ मार्च रोजी पुन्हा जुन्या संचालक मंडळाने बाजार समितीची सूत्रे हाती घेतली होती. सूत्रे हाती घेतल्यानंतर संचालक मंडळाने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा ठराव घेऊन तशी विनंती राज्य सरकारला केली होती.
या याचिकेवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यात जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाने बेजाबदारपणे काम केल्याचा अहवाल सादर केला. त्याआधारे सहकार मंत्र्यांनी संचालक मंडळाची मुदतवाढीचा मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंबाजोगाई बाजार समितीवर प्रशासक येणार आहे. 

Advertisement

Advertisement